तुमचं स्वागत आहे!
नमस्कार मी रोहन एक साॅफ्टवेअर अभियंता आहे. मला माहिती तंत्रज्ञाना मध्ये सुमारे १२ वर्षांचा अनुभव आहे. या १२ वर्षां दरम्यान मी दुरसंचार, वाणिज्य आणि औद्योगिक यांत्रिकीकरण अशा क्षेत्रांमध्ये काम केले आहे.
रिकाम्या वेळात मी माझा घरगुती प्रयोगशाळेवर काम करत असतो किवा वैयक्तिक प्रकल्पावर. मला मानवीय शाश्वतता आणि हवामान बदल मध्ये रस आहे. त्यामुळे या ब्लाॅगवर माझ्या वैयक्तिक प्रकल्पां बरोबर मी या विशयांबाबत पण लिहीणार आहे. अधुन मधून तुम्हाला एका अभियंता कडून अपेक्षीत अशी लिखाणंपण वाचायला मिळतील.
From the blog
तुम्ही जुन्या पोस्ट इथे वाचू शकता